आंध्रप्रदेशचे राज्यपाल एन. डी. तिवारी यांच्या सेक्स स्कॅण्डलच्या बातम्या सध्या सर्वीकडे प्रसारीत होत आहेत. नारायण दत्त अशी दोन देवांची नावे धारण केलेले ८२ वर्षाचे हे ’सदगृहस्थ’ किती निर्लज्ज आहेत, हे यातून दिसुन आले आहे. त्यांच्या पापांचा स्वीकार ते करणार नाहीत, हे सर्व जाणुनच आहेत. त्यामुळे, त्यांच्या कोणत्याही व्यक्तव्यांवर जनता विश्वास ठेवणार नाही. टिपिकल हिंदी चित्रपटातल्या राजकारणासारखे ते निघाले. तिवारी सापडले म्हणुन केवळ तेच चोर आहेत असे नाही. राजकारणातली बहुतांश मंडळी याच वर्गात मोडणारी असावी, यात शंका नाही. अर्थात, ज्यांची चोरी सिद्ध होत नाही, ते चोर नाहीत, असा गैरसमज सामान्य जनतेने करू घेवु नये. सुजान नागरीकांना अट्टल राजकारणी कोणत्या श्रेणीतले असतात, हे सांगणे न लागे.....
’आंध्र ज्योती’च्या या ऑपरेशनबद्दल त्यांचे हार्दिक धन्यवाद. भारतातल्या अन्य राजकारण्याच्या पोलखोलीची जबाबदारी आता कोण घेतो तेच बघायचे....
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com