Monday, January 11, 2010

का आयुष्य संपवतायेत विद्यार्थी?


हि बातमी वाचलीत...? तीच्यावर क्लिक करून पाहा. पाच जानेवारी २०१० च्या सर्वच मराठी वृत्तपत्रांनी विविध विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वृत्तांना ठळक प्रसिद्धी दिली होती. केवळ याच दिवशी नव्हे तर या नंतर मागच्या तीन-चार दिवसांपासून आत्महत्येचे पेवच फुटल्याचे दिसते. यातील बहुतांश आत्महत्या ह्या अभ्यासाच्या ताणातून किंवा स्पर्धेच्या तणावातून झाल्याच्या दिसून येतात. त्यामुळे अशा घटनांना जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे बनते. काहींनी तर सध्या गाजत असलेल्या ’थ्री इडियट्स’ या चित्रपटालाच जबाबदार धरले आहे. त्यातील आत्महत्येची दृश्ये काढून टाकण्याची मागणीही केली आहे. खरं तर ’थ्री इडियट्स’ हा आत्महत्येला नव्हे तर तो विद्यार्थी जीवन जगायला प्रोत्साहन देणारा चित्रपट आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा आपल्या शिक्षणपद्धतीचाच दोष आहे का? यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. आजचे शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी निश्चितच राहिलेले नाही, ही गोष्ट मान्य करायला हवी. उलट त्यांच्यावरील अभ्यासाचे ओझे वाढवून आपण त्यांच्या ताणातच भरच घालत आहोत. हाच ताण हळूहळू त्यांना असह्य होत आहे. त्याची परिणीती आत्महत्येपर्यंत होत असल्याने हा ताण किती असेल, हे आपल्याला समजून येईलच...! शिवाय त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे हे आहेच. खरं तर अभ्यास ही एक ’एन्जॉएबल’ गोष्ट असायला हवी, याउलट ती मनाला अधिकच ’ताण’ देणारी गोष्ट बनत चालली आहे, याचेच वाईट वाटते.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com