Monday, March 1, 2010

एका पिचकारीसाठी...

संध्याकाळी जेवण झाल्यावर एका दुकानात गेलो होतो. तिथे विक्रीसाठी ठेवलेली एक पिचकारी पाहिली. आज होळी असली तरी त्या पॅकेटमधली केवळ एकच पिचकारी विकली गेली होती. तेव्हा, दुपारी ’ई सकाळ’ वर वाचलेल्या एका बातमीची आठवण झाली. ती बातमी वाचली तेव्हाच अस्वस्थ झाले होते. ’ई सकाळ’ वरून ती मी इथे ’पेस्ट’ केली आहे...

भिवंडी - रंग खेळण्यासाठी पिचकारी आणि साखरगाठ्याची माळ आणण्यासाठी वडिलांकडे पैसे लहान मुलाचा रागाच्या भरात गळा दाबून खून केल्याची विदारक घटना भिवंडी तालुक्‍यातील आनगाव येथे घडली. विटभट्टीवर कामावर असताना ही घटना घडल्याने या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भिवंडी-वाडा मार्गावरील आनगाव येथे किशोर परशुराम जाधव यांच्या मालकिच्या विटभट्टीवर काम करीत असलेले संतोष पवार (वय ३९, रा. भैरवपाडा) हे त्याच्या कुटुंबासह राहतात. रविवारी होळीचा सण असल्याने सर्वत्र रंग खेळणारी मुले पाहून संतोष पवारांचा मुलगा रोशन पवार (वय ८) याने पिचकारी मागितली. मात्र, जवळ पैसे नसल्याने आणि सारखा मुलाकडून होत असलेल्या अट्टाहासामुळे संतापून मुलाचा गळा दाबून खून केला. या घटनेची गणेशपूरी पोलिस ठाण्यात माहिती मिळताच पोलिस निरिक्षक एस. एम. चौधरी व त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी जाऊन संतोष पवार याला अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबातमीवर काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकांनी सरकारवर शरसंधान साधले होते. खरोखर एखादा माणूस अगतिकपणे कोणते कृत्य करू शकतो, याचे हे उदाहरण आहे. आपल्या देशातील गरीबी किती भयानक आहे, याचा विचार आपण करू शकतो. संध्याकाळी ती पिचकारी पाहिली तेव्हा वाटले होते की, यातील एक त्या मुलाला नेवून द्यावी. पण, मी केवळ याचा विचार करू शकत होतो. प्रत्यक्ष कृती नाही...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com