Wednesday, June 9, 2010

’ह’ ची बाधा


आपण बोलत असणाऱ्या वाक्यातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर जरी बदलले तर अर्थाचा किती अनर्थ होतो. याच संकल्पनेवर आधारित विनोद तयार झाला तर? ’ई टीव्ही-मराठी’ वरच्या कॉमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमात ही संकल्पना वापरून विनोद निर्मिती करण्यात आली आहे. या पात्राचे नाव आहे, ’मिस्टर ह’. कारण, यातील कोणत्याच ऍक्ट मध्ये त्याचे नाव सांगण्यात आलेले नाही. ’मिस्टर ह’ हे आपल्या बोलण्यात प्रत्येक वाक्यातील प्रत्येक शब्दातील पहिले अक्षर हे ’ह’ च्या बाराखडीत बोलतात. ह्यामुळे हे हाय होलतात हे हमोरच्याला हळतच हाही.
कॉमेडी एक्सप्रेसमधल्या प्रत्येक ऍक्टमध्ये ’मिस्टर ह’ ची भूमिका ही आशिष पवार या उगवत्या विनोदी कलाकाराने केली आहे. व त्याला साथ द्यायला वैभव मांगले, अभिजित चव्हाण, भूषण कडू व कमलाकर सातपुते हे कलाकार आहेत. काही ऍक्टमध्ये कलाकारांचे टायमिंग व बोली ही उत्तम असल्याने चांगली विनोदनिर्मिती होते. त्यामुळे एकवेळ पाहायला काय हरकत आहे?

मिस्टर ह आणि...
१. सिव्हिल बिल्डर [वैभव मांगले]
२. जॉब इंटरव्ह्युसाठी [अभिजित चव्हाण]
३. केबलवाला [अभिजित चव्हाण]
४. हवालदार [कमलाकर सातपुते]
५. मराठी पंडित [कमलाकर सातपुते]
६. वाघोबा [भूषण कडू]
७. चमडी बाबा [भूषण कडू]
८. हिप्नॉटिस्ट [भूषण कडू]
९. रिक्षावाला [भूषण कडू]
१०. डॉक्टर [भूषण कडू]

1 comment:

to: tushar.kute@gmail.com