काळशेकर आहेत का? हा गेल्या वर्षी आलेला चित्रपट होय. मागील वर्षी तो पाहण्याची संधी मला मिळाली नव्हती. पण, कालच तो पाहिला. हा चित्रपट म्हणजे एक एक सस्पेंस, थ्रिलर, रोमॅंटिक कॉमेडीपट आहे. इतकी सर्व वैशिष्ट्ये असलेला मराठीतील एक पाहण्यासारखे चित्र होय.
काळशेकर अर्थात विजय चव्हाण हे यातील मध्यवर्ती पात्र होय. त्यांना सतत वाटत असते की, त्यांचा कोणीतरी खून करणार आहे. पण, कोण ते माहित नाही. बंगल्यावर ते एकटेच राहत असतात. एक दिवस पळून जावून लग्न केलेली प्रेमवीरांची जोडी अर्थात भरत जाधव व दिपाली सय्यद त्यांच्या बंगल्यावर येतात व पुढे यात कॉमेडी काय व रहस्य काय हे चित्रपटातच पाहण्याचे औत्सुक्याचे ठरेल. चित्रपटाची सुरूवातच लग्नाच्या मंडपातून होणाऱ्या पळवापळवीत होते. व पुढे ही कहाणी एक वेगळे वळण घेऊ लागते.
दिपाली सय्यदच्या आई व मामाची भूमिका अनुक्रमे उषा नाडकर्णी व पुरूषोत्तम बेर्डे यांनी केली आहे. त्या भूमिकेत ते फिट्ट बसतात. भरत जाधवला व दिपाली सय्यदला नेहमीचाच रोल मिळाल्याचे दिसते. दिपाली अजुनही आपल्या टिपिकल भूमिकेतून बाहेर येताना दिसत नाही. तिला तीची इमेज बदलविण्याची प्रकर्षाने गरज दिसते. चित्रपटात फारशी गाणी नाहितच. विजय सातघरे यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. पहिला प्रयत्न त्यांना बऱ्यापैकी जमल्याचे दिसते.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com