विश्वचषक स्पर्धा ऐन रंगात आली असताना संभाव्य विजेते म्हणल्या जाणाऱ्या ब्राझीलने स्वत:चा आत्मघात करून घेऊन विश्वचषकाची रंगत काहिशी कमी केली. कालच ब्राझीलने स्वयंगोल पदरात पाडून घेतला व विश्वचषकाला बाय-बाय केले. दुसरीकडे ’घाना’ या आफिकन वाघाला लॅटिन अमेरिकेच्या उरूग्वेने बाहेरची वाट दाखवून बऱ्याच वर्षांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरित प्रवेश केला. पहिल्या विश्वचषकाचे आयोजक व विजेते असणाऱ्या उरूग्वेने विश्वचषक विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. एक ब्राझीलसारखा तगडा लॅटिन अमेरिकन देश जरी विश्वचषकातून बाहेर पडला तरी अजुन उरूग्वे व अर्जेंटिनाने चालू ठेवलेली वाटचाल निश्चितच आनंददायी आहे.
ब्राझीलचा कालचा खेळ पहिल्या सत्रात चांगला झाला. नेहमीच आक्रमणावर भर देणाऱ्या ब्राझीलने कालही हाच डावपेच अवलंबला होता. पहिल्या सत्रात तो यशस्वी झाला. परंतु, द्वितीय सत्रात ब्राझीलकडून स्वयंगोल झाल्याने नेदरलॅन्ड्सचा आत्मविश्वास उंचावला व त्याचा परिणाम दुसऱ्या गोलात झाला. संभाव्य विजेत्यांची ही खेळी फोल ठरली. नेदरलॅन्ड्सचे मन:पूर्वक अभिनंदन! परंतु, लॅटिन अमेरिकेचे उरूग्वे व अर्जेंटिना अजुनही आपल्या खेळीने पुढे चाललेले आहेत. अशी आशा वाटते की, या वेळी विश्वचषक येथील संघच पटकावून नेईल.
दुसऱ्या सामन्यात घानाला उरूग्वेने बाहेर काढले. खरं तर विश्वचषकाच्या या फेरिपर्यंत घानाला कोणी जमेत धरले नव्हते. परंतु, त्यांनी छान खेळ केला. उरूग्वे व घानाचे नाव आपण भारतीय फक्त अशाच चार वर्षांतून एकदाच ऐकत असावेत...!
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com