Tuesday, May 17, 2011

सजवून साज जशी

अजय-अतुल ही संगीतकार जोडी म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले एक दिव्यस्वप्न आहे. मागील वर्षी मराठी चित्रसृष्टीला जोगवा व नटरंग मधील उत्तमोत्तम गीते त्यानी दिली. शिवाय राष्ट्रीय पुरस्कारही प्रथमच मराठीला मिळवून दिला. यंदा त्यांनी एक नवा प्रयोग मराठीतच नव्हे तर भारतीय चित्रपट सृष्टीला यशस्वी करून दाखविलाय. संजय नार्वेकरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ’आता गं बया’ या चित्रपटात एकाही वाद्याचा वापर न करता केवळ तोंडाच्या वाद्यांनी गीत त्यांनी तयार केले आहे. अतिशय अप्रतिम असे हे गीत आहे. त्याचे बोल इथे लिहित आहे. प्रत्यक्ष गीत मात्र चित्रपटात पाहता येईल. विशेष म्हणजे या चित्रपट गीताची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेली आहे.

गायक: हरिहरनमहालक्ष्मी अय्यर.


सजवून साज जशी

रुणझुण सांज तशी, सजनी तू रंगबावरी

सरल वार सुखाची... रिमझिमे जशी

छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी

हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी

सजना मी सांज सावरी...

नजर तुझी ही प्रिया वेड लावी,

भिरभिरते मी अशी भोवताली,

गोऱ्यागोऱ्या गालावरी आज लाज आली,

अवखळ डोळ्यात ह्या प्रीत गीत झाली,

अशी भूल जीवाला या पडते,

मखमल मनी उलगडते,

काळजाच्या काठावर हलते,

छेडी कुणी तार जशी...

हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी

सजना मी सांज सावरी...

सरल वार सुखाची... रिमझिमे जशी

छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी

सजवून साज जशी

रुणझुण सांज तशी, सजनी तू रंगबावरी

दव हळवे मी धुके धुंद व्हावे,

बिलगुन राणी तुला पांघरावे,

विसरून थांग सावली तुझीच व्हावे,

अलगद वाटे रे तुझ्यात मी भिनावे,

तुझ्यासाठी अशी तळमळते...

तुझ्याभोवताली घुटमळते...

पुनवेच्या चांदासाठी झुरते... वेडीपिशी रात जशी,

सजवून साज जशी

रुणझुण सांज तशी, सजनी तू रंगबावरी

सरल वार सुखाची... रिमझिमे जशी

छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी

हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी

सजना मी सांज सावरी...

हे गीत अजय अतुलने कसे तयार केले याबद्दल अजयने सांगितले आहे. तो व्हिडियो या लिंकवर पाहता येईल.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com