Friday, July 20, 2012

"हुरुफ़े हल्की"

उर्दू ही मूळची भारतीय भाषा असली तरी लिपी ही अरेबियन लिपी आहे. अरेबियन व पर्शियन भाषा लिहिण्यासाठी या लिपीचा वापर होतो. प्रत्येक लिपीचे स्वत:चे विशिष्ट उच्चार असतात. तसेच उर्दूचेही आहेत. अर्थात अरबी लिपीतीलच हे उच्चार उर्दूतही वापरण्यात येतात.
उर्दू मुळाक्षरे.
भारतीय भाषांतील स्वर व व्यंजनांचे उच्चार, हे बहुतांश सारखेच आहेत. परंतु, उर्दूची लिपी ही परकीय असल्याने तिच्यात काही मूळ अरबी उच्चारही समाविष्ट आहेत. व विशेष म्हणजे अरबीतही न वापरण्यात येणारे उच्चार उर्दूत समाविष्ट केले आहेततीच्या भारतियत्वाचा हा प्रभाव असावा. त्यामुळेच उर्दू व अरबी मुळाक्षरे यांत काही प्रमाणात फरक दिसून येतो. जसे अरबी भाषेत ’प’ हे अक्षरच नाही. परंतु, उर्दूमध्ये आहे. भारतीय भाषांतील ’प’ चा उच्चार अरेबियन ’ब’ असा करतात. भारतीय भाषांच्या प्रभावाने उर्दूचा अक्षरसंग्रह वाढला, हे मात्र नक्की!
अरेबियन लिपीत सहा अशी अक्षरे आहेत ज्यांना ’हुरूफ़े हल्की’ असे म्हणतात. हुरूफ़ म्हणजे मुळाक्षर व हलक म्हणजे ’कंठ’ होय. ज्या मुळाक्षरांचा उच्चार कंठातून केला जातो, त्यांना ’हुरूफ़े हल्की’ असे म्हणतात. मूळ उर्दू व अरबी भाषिकांनाच याचा उच्चार व्यवस्थित करता येतो. ज्यांना ’हुरूफ़े हल्की’चा उच्चार नीट येतो, त्यांनाच उर्दू भाषा बोलता येते, असे म्हणतात! सहा अक्षरांना ’भारतीय’ उच्चारही आहेत. बहुतांश जण मूळ अरबी उच्चारांऐवजी भारतीय उच्चार या शब्दांसाठी करतात. याचे विवेचन खालीलप्रमाणे:
)         ع (ऐन)                       - उदा. ऐनक
            याऐवजी उच्चार:         ا (अलिफ़).
)        غ (ग़ैन)                        - उदा. ग़ुलाम
            याऐवजी उच्चार:         گ (गाफ़)
)        ح (हे)                           - उदा. हलवा
            याऐवजी उच्चार:         ہ (हे)
)        خ (ख़े)                          - उदा. ख़ुदा
            याऐवजी उच्चार:         کھ ()           
)        ق (क़ाफ़)                      - उदा. क़लम
            याऐवजी उच्चार:         ک (काफ़)
)        ف (फ़े)                          - उदा. फ़िक़्र
            याऐवजी उच्चार:         پھ ()
यातील ग़, , , आणि फ़ या उच्चारांचा वापर हिंदीतही करण्यात येतो. परंतु, यातील बहुतांश शब्द हे उर्दूतून घेण्यात आलेले आहेत.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com