Wednesday, August 8, 2012

बघ उघडुनि दार…


नाशिकच्या रेडिओ मिर्चीमध्ये मागील आठवड्यापासून ’भारतीय’ या आगामी चित्रपटातील एक गीत ’एक्सक्लुसिव्हली’ ऐकवले जात आहे. प्रदर्शनापूर्वी मराठी चित्रपट गीत खाजगी रेडिओवर मी पहिल्यांदाच ऐकले. ’भारतीय’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातील हे गीत म्हणजे मराठी भजन आहे. रूपकुमार राठोड यांच्या आवाजातील इतके उत्तम गीत मी त्यांच्या ’बॉर्डर’ या चित्रपटानंतर पहिल्यादाच ऐकले. ३ ऑगस्टला ’भारतीय’ची सीडी आल्यावर हे गीत मला पुन: पुन्हा ऐकायला मिळाले. अत्यंत उत्कृष्ट शब्दरचना व चाल यांच्या जोडीला उत्तम गायकाची साथ लाभल्याने हे गीत स्वरणीय झाले आहे.
शोधुन श्री ना जीव हा तरी,
साद तुला ही पोहचल का?
दारोदारी हुडकल भारी,
थांग तुला कधी लागंल का?
श्याममुरारी, कुंजबिहारी,
तो शिरहारी भेटल का?
वाट मला त्या गाभाऱ्याची,
आज कुणीतरी दावल का?

बघ उघडुनि दार
अंतरंगातला देव गावल का?

तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो,
नाचे रंगुन संतांच्या मेळ्यात जो,
तुझ्या-माझ्यात भेटल साऱ्यात तो,
शोध नाही कुठे ह्या पसाऱ्यात जो,
रोज वृंदावनि फोडतो घागरी,
तोच नाथाघरी वाहतो कावडी,
गुंतला ना कधी मंदिरी राऊळी,
बाप झाला कधी, जाहला माऊली,
भाव भोळा जिथे, धावला तो तिथे,
भाव नाही जिथे, सांग धावल का?

बघ उघडुनि दार
अंतरंगातला देव गावल का?

राहतो माऊलीच्या जिव्हारात जो,
डोलतो मातलेल्या शिवारात तो,
जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो,
दाटुनि तोच आभाळी ओथंबतो,
नाचवे वीज जो त्या नभाच्या उरी,
होई काठी कधी आंधळ्याच्या करी,
घेऊनि वाट येतो, किनाऱ्यावरी,
तोल साऱ्या जगाचाही, तो सावरी,
राहतो तो मनी या जगी जीवनी,
एका पाषाणी तो सांग मावल का?

बघ उघडुनि दार,
अंतरंगातला देव घावल का?

चित्रपट: भारतीय (देविशा फिल्म्स).
गीतकार: गुरू ठाकुर.
संगीत: अजय-अतुल.
गायक: रूपकुमार राठोड.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com