एखाद्या
आंतरराष्ट्रीय कटावर हिंदी
चित्रपट तयार होणे,
ही
फार दुर्मिळ बाब आहे.
तशी
पद्धत हॉलिवूड मधे मोठ्या
प्रमाणात दिसते.
आपल्याकडे
मसालापट व प्रेमकथांव्यतिरिक्त
सशक्त कथा असणारे चित्रपट
खुप कमी तयार होतात.
’मद्रास
कॅफे’ मात्र या सर्व संकल्पनांना
छेद देतो.
सप्टेंबरमध्ये
रिलीज झालेला हा चित्रपट २०१३
या वर्षातील सर्वोत्तम
चित्रपटांपैकी एक आहे.
जॉन
अब्राहम निर्मित व अभिनित
’मद्रास कॅफे’ हा १९९१ मध्ये
झालेल्या राजीव गांधी यांच्या
हत्येच्या पार्श्वभूमीवर तयार
झालेला चित्रपट होय.
अडीच
तास लांबी असुनही केवळ खिळवून
ठेवणारी पटकथा असल्याने
चित्रपटातील थरार शेवटपर्यंत
कायम राहतो.
राजीव
गांधींचे नाव वा LTTE चे नाव
प्रत्यक्ष वापरले नसले तरी
पार्श्वभूमी पात्र पक्की
तयार केलीय.
ही
हत्या का झाली?
किंवा
ती टाळता आली असती का?
या
प्रश्नाचे उत्तर शोधण्यास
हा चित्रपट नक्कीच मदत करतो.
चित्रपटात
जॉन अब्राहम मध्यवर्ती भुमिकेत
आहे.
चित्रपट
सुरु होतो तो श्रीलंकेत.
त्या
काळातील तिथली परिस्थिती
हुबेहुब उभी करण्यात दिग्दर्शक
यशस्वी ठरलाय.
लंकेतील
तत्कालीन राजकारण व विशेषतः
प्रभाकरन अन तमिळ वाघांच
राजकारण योग्य व सुटसुटीत
रित्या दाखवण्यात आलय.
नक्की
कोणाचं बरोबर व कोणाच चुक?
या
प्रश्नाचे उत्तर शोधण्यास
हा चित्रपट प्रवृत्त करतो.
माजी
पंतप्रधानाच्या हत्येच्या
कटात जे आंतरराष्टीय राजकारण
त्याला हॉलिवूडपटाची झालर
नक्की दिसुन येते.
चित्रपट
जसाजसा पुढे सरकतो तसतसा अनेक
प्रश्नांचा उलगडा होत थरार
मात्र कायम राहतो.
हेच
चित्रपटाच यश आहे.
त्यामुळे
हा चित्रपट पहायलाच हवा.
’विकी
डोनर’ नंतर जॉन चा दुसरा
चित्रपटही उत्कृष्ट झालाय.
शिवाय
जुही चतुर्वेदीने आपल्या
लेखनाची सुरुवात ’विकी डोनर’
ने केली होती.
तिनेच
’मद्रास कॅफे’ चे संवादही
लिहिले आहेत.
हा
चित्रपट या वर्षी भारताकडून
ऑस्कर नॉमिनेशनच्या स्पर्धेत
होता.
परंतु,
त्याचे
नामांकन पाठवले गेले नाही.
तरी
त्याचे महत्व कमी होणार नाही.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com