तंत्रज्ञानाचा वापर आज जवळपास प्रत्येकच क्षेत्रात होतोय. पुस्तक निर्मिती,
विपणन व विक्री क्षेत्रही या पासून दूर राहिलेले नाही. आज अनेक
कंपन्यांनी पुस्तक व्यवसायात उडी घेतली आहे. वाचनसंस्कृतीवर आजही लोकांचा
मोठा विश्वास आहे. त्यामुळेच तंत्रज्ञानाचा वापर याही क्षेत्रात वाढत
चाललाय. आज तुम्ही घरबसल्या आपल्या भाषेतील पुस्तके मागू शकता. विविध वस्तू
खरेदी करताना जसे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय वा हात लावल्याशिवाय त्याचा
दर्जा कळत नाही, तसे पुस्तकांचे नाहीये. पुस्तकांचा दर्जा हात लावून समजत
नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कोणतीही शंका मनात न ठेवता आपण पुस्तके
मागू शकतो. खाली काही महत्त्वाच्या वेबसाईट्स दिल्या आहेत, तिथून तुम्ही
तुमचं अकाऊंट तयार करून पुस्तके कुरियरने घरपोच मागवू शकता. शिवाय तुमची
खरेदी 500 वा हजार रुपयांच्या वर असेल तर त्यासाठी वेगळे कुरिअर चार्जेस
द्यावे लागत नाहीत.
१. बुक गंगा (https://www.bookganga.com/)
मराठीतील सर्वात जास्त पुस्तके असणारी ही वेबसाइट आहे. तुम्हाला हवे असणारे जवळपास प्रत्येक पुस्तक तुम्हाला या वेबसाइटवर मिळू शकेल. शिवाय सदर पुस्तकाची पहिली दहा-पंधरा पाने तुम्ही वाचू शकता. जेणेकरून पुस्तकाचा आशय व लेखकाची लेखनशैली तुम्हाला तपासता येईल. अनेक पुस्तके ई-बुक स्वरूपात ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकावर तुमचा अभिप्राय अर्थात रीव्ह्यू टाकण्याची सुविधा बुकगंगा ने उपलब्ध करून दिली आहे. अनेक पुस्तकांवर कमीत कमी पाच ते दहा टक्के सूटही तुम्हाला मिळू शकेल. बुकगंगाचं बुक स्टोअर पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात आहे. तिथेही तुम्ही पुस्तके खरेदी करू शकता.
२. अक्षरधारा (https://www.akshardhara.com/)
पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर असणारे अक्षरधारा बुक गॅलरी हे पुस्तकालय होय. या पुस्तकालयातही मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत. ती तुम्ही प्रत्यक्ष जाऊन वा ऑनलाईन खरेदी करू शकता. त्यांच्या वेबसाइटवर शाखानुसार, प्रकाशननुसार, लेखकानुसार पुस्तक शोधण्याची सुविधा दिली आहे. व बहुतांशी पुस्तकांवर थेट कमीत कमी दहा टक्के सुटही उपलब्ध आहे. सभासदत्वाची सुविधाही अक्षयधाराने देऊ केली आहे. या अंतर्गत पुस्तकांवर अधिक सूटही मिळवता येते.
३. अमेझॉन इंडिया (https://www.amazon.in/)
ही भारताची सर्वाधिक पुस्तके विक्री करणारी वेबसाईट आहे. मराठीतील खूप पुस्तके त्यांच्या संकेतस्थळावरून तुम्ही खरेदी करु शकता. अमेझॉन सर्च साठी उपलब्ध असणारे सर्व ऑप्शन्स तुम्हाला पुस्तके शोधण्यासाठी वापरता येतात. अमेझॉन चे स्पेशल सेल चालू असताना अमेझॉन बुक्स ला भेट द्यायला विसरू नका. अनेक मोठी पुस्तके भल्यामोठ्या सूटच्या रूपाने इथे उपलब्ध होऊ शकतात. मी स्वतः मेहता पब्लिकेशनच्या सर्व मोठ्या कादंबऱ्या (स्वामी धरून!) 49 टक्के डिस्काऊंट मध्ये खरेदी केल्या होत्या! एवढा डिस्काउंट मला मेहतांच्या गॅलरीत पण मिळत नाही.
सर्वात अभिमानाची बाब म्हणजे सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकात अमेझॉन इंडियावर मराठी ही हिंदी नंतरची दूसरी भारतीय भाषा आहे! अमेझॉनचे स्वतःचे किंडल नावाची ई-बुक रीडर आहे. अनेक मराठी पुस्तके किंडल धारकांना मोफत ही वाचता येतात.
४. मेहता पब्लिशिंग हाऊस (http://www.mehtapublishinghouse.com/)
या ठिकाणी फक्त मेहता पब्लिशिंग हाऊसनेच प्रकाशित केलेली पुस्तके तुम्हाला विकत घेता येतील. शिवाय त्यांची सभासद होण्याची सुविधाही उपलब्ध आहे, ज्यात तुम्हाला 30 टक्क्यांपर्यंत एका पुस्तकावरही सूट मिळू शकते! आनंद यादव, वि. स. खांडेकर, द. मा. मिरासदार, रणजित देसाई, व. पु. काळे, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, विश्वास पाटील, सुधा मूर्ती, स्वाती चांदोरकर यांच्यासारख्या दिग्गज मराठी लेखकांची पुस्तके या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आज-काल इथे नव्याने येणारी पुस्तके ही बहुतांशी अनुवादित असतात.
५. बुक्सनामा (https://www.booksnama.com/)
डायमंड पब्लिकेशनची सर्व पुस्तके या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याशिवाय विविध विषयांची पुस्तके येथून तुम्ही भरघोस सूट घेऊन खरेदी करू शकता.
वरील साईट व्यतिरिक्त अजूनही काही वेबसाइट्स आहेत, जिथून सहजपणे पुस्तके मागवता येतात. त्यांचाही वापर तुम्ही बिनधास्त करू शकता.
https://www.flipkart.com/
https://www.granthdwar.com
https://www.bookvishwa.com/
https://www.rasik.com/
https://www.shubhambooksonline.com/
http://www.menakabooks.com/
https://www.suyashbookgallery.com/
कधीकधी बुक गॅलरीतून पुस्तक मागण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रकाशनाकडूनच मागण्यास सोयीचे पडते व कमी किमतीत ते उपलब्ध होऊ शकते. बऱ्याच मोठ्या प्रकाशकांनी ऑनलाईन पुस्तके विक्रीची सोय वाचकांना करून दिली आहे.
१. मेहता पब्लिशिंग हाऊस (http://www.mehtapublishinghouse.com/)
२. मनोविकास (https://www.manovikasprakashan.com/)
३. राजहंस (https://www.rajhansprakashan.com/)
४. सकाळ (http://sakalpublications.com/)
५. कॉन्टिनेन्टल (http://continentalprakashan.com/)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com