आपण म्हणतो की, शिक्षण हे प्रत्येकाच्या हक्काचा आहे. यातील
'हक्क' या शब्दाचा नक्की अर्थ काय? कदाचित प्रत्येकाची व्याख्या ही वेगळी
असू शकते. ग्रामीण व दुर्गम भागात आजही शिक्षणाला व शाळांना प्राथमिक स्थान
न देता दुय्यम स्थान प्राप्त झालेले आहे. परंतु, शिक्षण किती महत्वाचे आहे
व तेच प्राप्त करण्यासाठी आजही ग्रामीण विद्यार्थ्यांना किती कसरत व मेहनत
करावी लागते, याचे चित्रण करणारा चित्रपट म्हणजे उबुंटू!
आजवर आम्ही 'उबुंटू' नावाची ऑपरेटिंग सिस्टिम वापरली होती. परंतु त्याचा शब्दार्थ या चित्रपटातून प्रतीत झाल्याचे दिसले. त्याची कथा सुरू होते ढोबळेवाडी नावाच्या एका दुर्गम गावातून. या गावातील शाळेत पस्तीस पटसंख्या असणारी शाळा आहे. परंतु मोठ्या अनुपस्थितीमुळे गावकरी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतात. शाळेचे शिक्षक मात्र मेहनती व ध्येयवादी आहेत. ते त्यांचा प्रयत्न चालूच ठेवतात. पण काही महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांच्या गावी त्यांना जावे लागते. मग पुढे शाळेतल्या हुशार विद्यार्थ्यांची शाळा टिकवण्याची धडपड चालू होते. गावातून बाहेर पडून ते शहराच्या ठिकाणी येतात तेव्हा शिक्षकांनी शिकवलेल्या ज्ञानाचा त्यांना पुरेपूर फायदा होतो. असा हा एकंदरीत चित्रपटाचा कथासार आहे. शिक्षण या विषयाला वाहिलेल्या मराठीतील काही चित्रपटांमधला हा एक चित्रपट होय. यातील गाणीही अत्यंत प्रभावशाली व प्रसंगानुरूप बोलणारी आहेत. तीच प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकून जातात.
या चित्रपटातील एक प्रार्थना खूप लोकप्रिय झाली होती.
हीच आमची प्रार्थना
अन हेच आमचे मागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com