जी. ए. कुलकर्णी यांचा मी वाचलेला हा पहिलाच कथासंग्रह. 'आधारित कथा' असे
उपशीर्षक या पुस्तकाला देण्यात आले आहे. सर्वच कथा या 'परिकथा' या प्रकारात
मोडणाऱ्या आहेत. मराठीतल्या 'फॅन्टसी' प्रकारात मोडणारे हे साहित्य मानता
येईल. प्रत्येक कथेचा वेग मात्र प्रचंड आहे. कुठेही पाल्हाळ न लावता सहज
समजणाऱ्या व सुटसुटीत कथा हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. एकूण बारा कथा
या पुस्तकात आहेत. काही कथांवर पूर्ण चित्रपट तयार होईल इतपत त्या दीर्घ
आहेत. पहिल्याच कथेत अर्थात 'तीन सोनेरी केस' या कथेने 'जी. एं'च्या लेखन
कौशल्याची चुणूक आम्ही अनुभवली. परिकथेची आवड असणार्यांनी वाचावे असेच हे
पुस्तक आहे.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com