सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आणि पर्यटनावर
बंदी असल्याने किल्ले भ्रमंती करता येत नाही. दुर्गभ्रमंती करणाऱ्यांसाठी
सध्या कठीण काळ चालू आहे! त्यामुळे पावले घरात थांबली आहेत आणि किल्ले ओस
पडलेले आहेत.
घरच्या घरी किल्ले पाहण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे दुर्गभ्रमंती वर लिहिली गेलेली पुस्तके. अनेक पुस्तकांमध्ये छायाचित्रे समाविष्ट नाहीत. परंतु उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं "हवाई मुलुखगिरी" हे पुस्तक मात्र अपवाद आहे. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांचे रंगीत बर्ड आय व्ह्यूज या पुस्तकातून पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशी छायाचित्रे या पुस्तकांमध्ये आहेत. भुईकोट किल्ले, गिरीदुर्ग आणि सागरी दुर्ग अशा सर्व प्रकारचे किल्ले यात समाविष्ट आहेत. सह्याद्रीचं दुर्गसौंदर्य उद्धव ठाकरे यांनी अप्रतिमरीत्या आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त केलं आहे. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी छायाचित्रे या पुस्तकात पाहता येतात. आमच्या जुन्नर मधले जवळपास सर्वच किल्ले या पुस्तकात आहेत. याशिवाय लेणी, घाटवाटा कोकण कडा अशा विविधरंगी छायाचित्रांनी हे पुस्तक सजलेलं आहे. पावसाळ्यातली छायाचित्रे तर अतिशय मनमोहक आहेत. त्यांच्याकडे पाहातच रहावसं वाटतं. पुस्तकात केवळ छायाचित्रच नाही, तर मिलिंद गुणाजी यांनी किल्ल्यांची वर्णने देखील केलेली आहेत. त्यामुळे घरबसल्या सह्याद्रीची भ्रमंती करण्यासाठी हे पुस्तक एक उत्तम "आधार" म्हणून बघता येईल!

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com