गूगल क्रोम एक्सटेंशन
जगातील सर्वाधिक संगणकांमध्ये वापरण्यात येणारा वेब ब्राउझर म्हणजे गुगल क्रोम होय. गुगलने तयार केलेला हा वेब ब्राऊजर जगातील दोन तृतीयांश संगणकांमध्ये वापरण्यात येतो. या ब्राउझरद्वारे अतिशय वेगाने इंटरनेट ब्राउझिंग करता येत असल्या कारणाने तो सर्वात लोकप्रिय ब्राउझर म्हणून गणला गेलेला आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गुगलने नैसर्गिक भाषा प्रक्रिया अर्थात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या सर्वच उत्पादनांचा वापर आपल्याला या वेब ब्राउझरमध्ये करता येतो.
मागील लेखामध्ये आपण गूगल क्लाऊड इनपुट टूल्सचा वापर करून मराठी भाषा कशी लिहायची, हे पाहिले. तशाच प्रकारच्या क्लाऊड इनपुट टूल्सचा वापर गुगल क्रोम ब्राउजरमध्ये थेट एक्सटेन्शनचा वापर करून करता येतो. गूगल क्रोम एक्सटेंशन म्हणजे या वेब ब्राउझरला गुगलद्वारे देण्यात येणारी अतिरिक्त सुविधा आहे. ज्यामध्ये हजारो एक्स्टेंशन्स आज गूगल क्रोममध्ये उपलब्ध आहेत. त्यातीलच एक एक्सटेंशन म्हणजे 'गूगल इनपुट टूल्स' होय. त्याचा वापर करायचा असल्यास क्रोमच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
https://chrome.google.com/webstore/category/extensions

चित्र क्रमांक १ मध्ये दाखवल्याप्रमाणे गुगल क्रोमचे वेब स्टोअर उघडेल. या संकेतस्थळावर डाव्या बाजूला Search the Store लिहिलेले एक टेक्स्टबॉक्स दिसेल. त्यामध्ये google input tools असे इंग्रजीमध्ये टाईप करा.
चित्र क्रमांक २ मध्ये दाखवल्याप्रमाणे गूगल इनपुट टूल्सचे एक्सटेंशन तुम्हाला दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर चित्र क्रमांक ३ प्रमाणे विंडो उघडेल.
आता Add to Chrome या बटनावर क्लिक करा. यानंतर तुमच्या वेब ब्राउझरला चित्र क्रमांक ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे पॉप डाऊन विंडो उघडेल.
आता Add Extension या बटणावर क्लिक करा. नंतर लगेचच क्रोमच्या अधिकृत संकेतस्थळावरून सदर एक्सटेन्शन डाउनलोड होईल व चित्र क्रमांक ५ मध्ये दाखविल्याप्रमाणे एक मेसेज तुम्हाला उजव्या बाजूला वरील कोपऱ्यामध्ये दिसून येईल.
त्यावर क्लिक केल्यानंतर गूगल इनपुट टूल्स इन्स्टॉल झालेले दिसेल. चित्र क्रमांक ६ मध्ये दाखविल्याप्रमाणे या नावासमोरील 'पिन आयकॉन'वर क्लिक करा.
यामुळे सदर एक्सटेन्शन फ्रंट पेज वर तुम्हाला सातत्याने दिसून येईल. चित्र क्रमांक ७ मध्ये दाखविल्याप्रमाणे या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसून येतील. यापैकी पहिल्या Extension Option वर क्लिक करा.
इनपुट टूल्समध्ये असलेल्या गुगलने दिलेल्या सर्व भाषा आता तुम्हाला दिसून येतील. खाली स्क्रोल करुन डाव्या बाजूच्या विंडोमध्ये मराठी भाषा शोधा. त्यावर क्लिक करा व समोरील बाणावर क्लिक करून भाषा निवडा. याद्वारे मराठी भाषा उजव्या बाजूच्या विंडोमध्ये अर्थात 'सिलेक्टेड इनपुट टूल्स'मध्ये तुम्हाला दिसून येईल. याकरता चित्र क्रमांक ८ तपासा.
आता चित्र क्रमांक ९ मध्ये दाखविल्याप्रमाणे गूगल इनपुट टूल्सच्या उजव्या वरील कोपऱ्यातील आयकॉनवर क्लिक करा.
ज्याद्वारे तुम्हाला मराठी नाव सर्वात वरच्या बाजूला दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर मराठी टायपिंग सक्षम होईल. आता कोणत्याही वेबसाइटवर तुम्ही मराठीमध्ये टाईप करू शकता.
गूगल इनपुट टूल्सचे आयकॉन 'म' या अक्षराने तुम्हाला दिसून येईल. ते निळ्या रंगामध्ये असल्यास मराठी टायपिंग चालू आहे, असे समजते. चित्र क्रमांक १० मध्ये दाखविल्याप्रमाणे गुगलची वेबसाईट ओपन करून त्यामध्ये मराठीमध्ये लिहायला सुरुवात करा.

जी अक्षरे अथवा शब्द तुम्ही इंग्रजीमध्ये लिहाल, ती मराठी मध्ये टाईप झालेली दिसून येतील. अशाप्रकारे तुम्ही गुगलमध्ये थेट मराठी भाषेमध्ये सर्च करू शकता. शिवाय एखादा मराठी लेख लिहायचा असल्यास गुगल डॉक्युमेंट्सचा (docs.google.com) देखील वापर करता येऊ शकतो. चित्र क्रमांक ११ मध्ये दाखविल्याप्रमाणे मी गुगल डॉक्यूमेंटची वेबसाईट उघडलेली आहे. त्यातील एका नव्या डॉक्युमेंट मध्ये मी गूगल इनपुट टूल्सचा वापर करून टाईप केलेले आहे.
अशाच पद्धतीने गूगल इनपुट टूल्सचा वापर अन्य ठिकाणी देखील करता येऊ शकतो. उदाहरणार्थ चित्र क्रमांक 12 मध्ये दाखविल्याप्रमाणे विकिपीडियाच्या वेबसाईट वर मी मराठी भाषा या नावाने सर्च केलेले आहे.
अशाच पद्धतीने तुम्ही अन्य वेबसाईटवर देखील मराठी भाषेचा थेट वापर करू शकता. याकरिता कोणत्याही प्रकारच्या फॉन्टच्या वापराची आवश्यकता नाही. पुन्हा कुठे जर इंग्रजी मध्ये लिहायचे असल्यास, उजव्या वरील कोपऱ्यातील 'म' अक्षरावरून क्लिक करून ते बंद करा. आता इंग्रजी मध्ये तुम्हाला टाईप करता येऊ शकेल. या एक्स्टेंशनची सुविधा केवळ गूगल क्रोम वेब ब्राऊजर मध्येच करण्यात आलेली आहे. इंटरनेटवर मराठीचा सहज वापर करण्यासाठी याचा उपयोग करा. धन्यवाद!
Very informative sir.Thank you sir
ReplyDeleteThanks..
DeleteVery nice information sir b
ReplyDeleteThanks .
Delete👌👌
ReplyDelete👍👍
Deleteमराठी टंकलेखन हेतू गुगलचा हा पर्याय सर्वोत्तम आहे.
ReplyDeleteआपण दिलेली महिती अर्थपूर्ण आहे.