“महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये लोकप्रिय असणारी पुण्याची विनम्र
अभिनेत्री म्हणजेच प्रियदर्शनी इंदलकर. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या
‘फुलराणी’ चित्रपटासाठी तिला २०२४ मध्ये प्रदार्पण करणाऱ्या सर्वोत्तम
अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला होता. याशिवाय दैनिक सकाळचा
नवीन चेहरा पुरस्कार देखील तिला याच वर्षी मिळाला. मध्यवर्ती भूमिका असणारा
‘फुलराणी’ हा तिचा पहिला चित्रपट असला तरी सन २०२१ मध्ये तिने एका मराठी
चित्रपटांमध्ये अतिशय छोटी भूमिका पार पाडली होती. नीना कुलकर्णी अभिनित
फोटोप्रेम या चित्रपटामध्ये एक ते दोन मिनिटांसाठी प्रियदर्शनी दिसून येते.
नीना कुलकर्णी यांच्या तरुण वयातील भूमिकेत प्रियदर्शनी चित्रपटाच्या
पडद्यावर वावरली आहे. कदाचित अतिशय कमी जणांना ही माहिती असावी. विशेष
म्हणजे प्रियदर्शनीच्या विकिपीडिया पानावर देखील याविषयी कोणतीच माहिती
लिहिलेली नाही. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
चित्रपटातील एक ते दोन मिनिटांच्या भूमिकेमध्ये देखील ती लक्षात राहते हे विशेष!
Wednesday, July 31, 2024
फोटोप्रेम मधील प्रियदर्शिनी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com