परिवार आणि नातेसंबंध यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट मराठी
चित्रसृष्टीमध्ये तयार झालेले आहेत. मागच्या एक-दीड वर्षांचा विचार केला तर
आई-मुलगी, वडील-मुलगा, वडील-मुलगी यांच्या नात्यांवर आधारित तीन मोठे
चित्रपट पाहायला मिळाले.
आईविना वाढत असणारी मुलगी आणि तिचे वडील यांचे
कथानक “बापमाणूस” या चित्रपटामध्ये पाहायला मिळते. आपल्या लहान मुलीला
आईशिवाय वाढवणारा धडपडा तरुण या चित्रपटामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो.
अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा केला गेलेला “बापल्योक” हा चित्रपट
वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करतो. मुलाच्या लग्नाच्या चिंतेत असणारा
गावाकडचा बाप या चित्रपटातून आपल्याला दिसतो.
तर याच वर्षी प्रदर्शित
झालेल्या “मायलेक” या चित्रपटामध्ये पौगंडावस्थेतील मुलीचे आणि तिच्या
आईच्या नातेसंबंधांचे विश्व आपल्याला अनुभवायला मिळते.
बापमाणूस आणि
मायलेक हे दोन्ही चित्रपट पूर्णपणे परदेशामध्ये चित्रित झालेले आहेत.
त्यामुळे सातत्याने इंग्रजी शब्द कानावर पडतात. या उलट बापल्योकमध्ये
पूर्णपणे ग्रामीण बोली ऐकायला मिळते. किमान एकदा तरी पहावेत असेच हे
चित्रपट आहेत.
Tuesday, August 6, 2024
बापमाणूस, बापल्योक आणि मायलेक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com