मराठी भाषेतून तंत्रज्ञान विषयावर लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक नाव म्हणजे अतुल कहाते होय. त्यांनी जवळपास ७६ पुस्तके लिहिलेली आहेत. अशा बहुआयामी लेखकाची मुलाखत घेण्याचे काम बुकविश्वच्या टीमने माझ्यावर सोपवले होते. खरंतर हा माझा पहिलाच प्रयत्न होता. अर्थात यामुळे मनावर दडपण तर होतेच. परंतु, कहाते सरांची मागच्या दोन वर्षांपासून माझी ओळख होती. आमच्यामध्ये सातत्याने विचारांची देवाणघेवाण व्हायची. याच कारणास्तव मुलाखतीमध्ये मी त्यांच्याशी सहजपणे संवाद साधू शकलो. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सरांचे बहुमोल ज्ञान वाचकांना आणि श्रोत्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो, याचा आनंद आहे.
AI चा इतिहास, त्याची प्रगती, त्याचा आवाका, त्याचे उपयोग, आव्हानं, संधी या सगळ्यांवर भाष्यं करुन लोकांना AI ची ओळख करुन अतुल कहाते यांनी या मुलाखतीतून करून दिली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधल्या एक्स्पर्ट सिस्टिम्स, रोबॉटिक्स, नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग, मशीन आणि डीप लर्निंग अशा अनेक तंत्रज्ञानाचा इतिहास, मूलतत्व, उपयोग आणि भविष्यवेध ! तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांच्यातील परस्पर-संबंध, यंत्रमानवांनी भारलेल्या जगाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा विकास, कोणकोणत्या क्षेत्रांत यंत्रमानवरूपी क्रांती घडणार आहे, हॉलिवूड चित्रपटांमधील यंत्रमानवांचा वावर, विज्ञानकथांनी केलेली यंत्रमानवी संस्कृतीची भाकिते, इ. चा वस्तुनिष्ठ आणि रंजक पद्धतीने वेध कहाते सरांनी या मुलाखतीतून घेतला आहे.
नक्की ऐका आणि बुकविश्वला सबस्क्राईब करा: https://youtu.be/uRUVSi14Ysg
#interview #atulkahate #artificialintelligence #marathi #technology #machinelearning #bookvishwa
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com