ज्येष्ठ मराठी लेखक, पत्रकार व संपादक श्री. रवी आमले यांची “रॉ - भारतीय गुप्तचर संस्थेची गुढगाथा”, “प्रोपगंडा” आणि “परकीय हात” ही पुस्तके प्रामुख्याने सर्वांना सुपरिचित आहेत. ही पुस्तके वाचताना त्यांचा या विषयांवरील सखोल अभ्यास ध्यानात येतो. ‘बुकविश्व’च्या युट्युब पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांची पुनश्च एकदा ‘बुकविश्व’च्या स्टुडिओमध्ये भेट झाली. मराठी लेखक श्री. चेतन कोळी यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. ही आम्ही लाईव्ह बघितली. भारताची गुप्तचर संस्था “रॉ” याविषयी ते भरभरून बोलले, सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेली गुपिते देखील त्यांनी उघड केली, हेरांच्या कहाण्या सांगितल्या….. सर्व काही अद्भुत होतं. यातून लेखकाला पुस्तक लिहिण्यासाठी किती सखोल अभ्यास करावा लागतो, हे देखील ध्यानात आले. त्यांची पुस्तके म्हणजे गुप्तहेरांसाठी संदर्भग्रंथ ठरावी अशीच आहेत.
बुकविश्वच्या या मुलाखतीतून भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉच्या अनेक ज्ञात-अज्ञात अधिका-यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणांस भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचे दर्शन रवी आमले घडवतात...
ही मुलाखत पहायला आणि बुकविश्वच्या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका :
लिंक: https://youtu.be/D7s2gfZXU20
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com