गावाकडून अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राहून शहराकडे आलेला एक तरुण आहे.
त्याच्या अंगी कला गुण आहे. तो जोपासण्यातच त्याचे आयुष्य चाललेले आहे.
आजूबाजूच्या लोकांना त्याच्या कलागुणांची कदर असते तर काहींना नसतेही.
परंतु
एक दिवस तो शहरामध्ये येतो. शहरातल्या लोकांना त्याच्या कलागुणांची कदर
असते. कलाक्षेत्रात प्रवेश करताना त्याचा संघर्ष सुरू होतो. परंतु
आत्मविश्वासाने एकेक पायरी टाकत तो आपल्या कलाक्षेत्रामध्ये उच्च शिखर
पादाक्रांत करतो. मिळालेले यश प्रत्येकालाच टिकवता येत नाही. असंच काहीसं
त्याच्या बाबतीत होतं. यशाची धुंदी त्याच्यावर चढते आणि याच कारणास्तव तो
दारूच्या धुंदीतही राहू लागतो. व्यभिचार सुरु होतो... आणि त्यात तो वाहवत
जातो. हळूहळू त्याला आपल्या लोकांचाही विसर पडू लागतो. आपल्याला यशाच्या
शिखरावर पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांना देखील तो विसरू लागतो आणि एक
दिवस अचानक आपल्या बेशिस्त स्वभावामुळे त्याची अपयशाकडे वाटचाल चालू होते.
परंतु त्यातूनही तो सुधारत नाही. मी म्हणजे सर्वस्व, मी या जगामध्ये काहीही
करू शकतो, अशा विचारांनी बेभान झालेला तो अचानक जमिनीवर येतो. परंतु तोवर
वेळ निघून गेलेली असते!
यश मिळवण्यासाठी अखंड मेहनत गरजेची आहे, परंतु
ते टिकवण्यासाठी जीवनात शिस्त आणि संयम देखील गरजेचं असतो. अशी शिकवण
देणारे हे दोन्ही चित्रपट! दोन्हींचा आशय सारखा आहे, कथा मात्र वेगळी! एक
गायक तर दुसरा रंगकर्मी! दोघांचाही शून्यापासून सुरू झालेल्या प्रवास या
चित्रपटांमध्ये पाहता येतो.
खरं तर ही एक शिकवण आहे, त्या
प्रत्येकासाठी ज्यांना यशाच्या शिखरावर पोहोचायचे आहे आणि ते यश शेवटपर्यंत
टिकवून देखील दाखवायचं आहे. हवं तर त्यांना आपण बोधकथा असं देखील म्हणू
शकतो.
Tuesday, December 24, 2024
एक तारा आणि रंगकर्मी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com