फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आजचे आद्याक्षर आहे: ‘आ’.
आराम
• फारसी मूळ: آرام (Ārām)
• मराठी अर्थ: विश्रांती, सुख
आवाज
• फारसी मूळ: آواز (Āvāz)
• मराठी अर्थ: ध्वनी
आशिक
• फारसी मूळ: عاشق (Āshiq)
• मराठी अर्थ: प्रेमी
आलिशान
• फारसी मूळ: عالیشان (Ālīshān)
• मराठी अर्थ: भव्य, शानदार
आमदनी
• फारसी मूळ: آمدنی (Āmadnī)
• मराठी अर्थ: उत्पन्न
या अद्याक्षराने सुरू होणारी ही यादी कदाचित परिपूर्ण नाही. आपल्यालाही काही शब्द माहित असल्यास कमेंट मध्ये लिहावेत.
— तुषार भ. कुटे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com